बेळगाव : खानापूर बेळगाव भागात गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवारी 24 रोजी देखील सुट्टी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जाहीर केली आहे.
खानापूर तालुका, बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण भागात व खानापूर तालुका आणि कितुर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक 24 जुलै रोजी सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. काल शनिवारी 22 रोजी केवळ खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत बेळगावात देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सोमवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.