- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : अखिल भारतीय कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर तालुका, यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे अवचित साधून रविवार दि. 01 रोजी मोफत नेत्र शिबीर मोदेकोप मराठी शाळेत सकाळी ठीक 10 ते दुपारी 3 पर्यंत ठेवण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्वांनी यात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर व तालुका आरोग्य खाते तसेच नागुर्डा व निलावडे ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून सदर नेत्र शिबिर, आरोग्य तपासणी व स्त्रिया करिता मोफत तपासणी असा उपक्रम राबविला जाणार आहे. 40 वर्षांवरील वरील स्त्री पुरुष करिता नेत्र चिकित्सा करून मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू असल्यास मोफत सरकारी सवलती मध्ये ऑपरेशन करून चष्मे दिले जाणार आहेत ज्येष्ठ नागरिक करिता मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला आणि औषधे दिली जाणार आहेत. करीता आपले आधार कार्ड, रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत आवश्यक असून तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर
- 8277109909, 9448381539,
- 9241417357, 9164103842,
- 8722258114, 9380698844,
- 9019246236, श्री संपर्क साधावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.