बंगलोर: खानापूर तालुक्यात २३५ अतिथी शिक्षक मंजूर करा आमदार हलगेकर यांचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांना निवेदन खानापूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्र अति मागासलेले आहे. प्राथमिक शाळांमध्ये पूरक शिक्षक नसल्याने अनेक शाळा एकेरी शिक्षकावर चालत आहेत. त्यामुळे गेल्या दशकभरापासून खानापूर तालुक्यात अतिथी शिक्षकांच्यावर शाळांचा अतीभर आहे. पण या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात केवळ 30 अतिथी शिक्षक मंजूर करण्यात आल्याने यावर्षीचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी खानापूर तालुक्याकरिता जवळपास 235 अतिथी शिक्षक मंजूर करण्यात यावेत. व शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी कर्नाटक राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्याकडे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यात शैक्षणिक समक्ष गंभीर असून ती त्वरित सोडवण्यासाठी शिक्षण खात्याने क्रम हाती घ्यावेत. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक मराठी शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी 235 अतिथी शिक्षकांची त्वरित भरती करण्यात यावी अशी मागणी केली.
शाळांच्या रिपेरीसाठी विशेष अनुदान मंजूर करा
खानापूर तालुक्यात जवळपास 119 शाळांच्या इमारती दुरुस्ती अभावी धोक्याच्या बनल्या आहेत. तर जवळपास 47 ठिकाणी नवीन शाळा इमारती बांधनी करणे गरजेचे आहे. तर जवळपास 19 इमारती पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्या ताबडतोब पाडून त्या ठिकाणी नूतन इमारती बांधण्यात याव्यात असा प्रस्ताव यापूर्वी शिक्षण खात्याकडे करण्यात आला आहे. परंतु त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. यासाठी खानापूर तालुक्यातील नवीन इमारती व शाळा दुरुस्तींच्या करिता त्वरित अनुदान मंजूर करावे व खानापूर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. यावेळी मंत्री मधु बंगाराप्पा यांचा खानापूर तालुका भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप, माजी तालुका पंचायत सदस्य चांगाप्पा निलजकर, वकील सुरेश भोसले, भाजपा युवा कार्यकर्ते सदानंद पाटील, माजी ता.प सदस्य श्रीकांत इटगी आदी उपस्थित होते.