IMG-20230318-WA0078

खानापुर : खानापूर तालुक्यात एकेकाळी सीमा चळवळीचे प्रणेते व साहित्याचे गाढे अभ्यासक स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई यांचे नाव आजही चीर परिचित यांच्या आकस्मित जाण्याला दोन वर्षे उलटली तरी त्यांच्या आचार विचारांची देवाणघेवाण माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जन्मदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खानापूर तालुक्यात मी मराठी आम्ही मराठी चळवळ जागृत ठेवण्यासाठी मराठी भाषिकांचा पालक मेळावा आज  रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शुभम गार्डन जांबोटी रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याते व राजामाता जिजाऊ माँसाहेबांचे वंशज श्री नामदेवराव जाधव पुणे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खानापूर शिवस्मारक येथे शनिवारी बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत कै उदयसिंहराव सरदेसाई यांचे सुपुत्र व मेळाव्याचे स्वागताध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री निरंजन सरदेसाई दिली.

निरंजन सरदेसाई म्हणाले, हा मेळावा केवळ खानापूर तालुक्यात मराठी भाषा संवर्धन व जागृती ठेवण्यासाठी आयोजित केला आहे यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नाही आमच्या वडिलांना आज जाऊन दोन वर्षे उलटली तरी त्यांची आठवण आचार विचार निरंतर ठेवण्यासाठी त्यांच्या जन्मदिनाच्या अमृत व असे वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खानापूर तालुक्यात अलीकडे होत चाललेली मराठीची मळगळ शाळांची गंभीर परिस्थिती बेरोजगारी विद्यार्थ्यांची आत्महत्या अशा गंभीर बाबीवर चर्चासत्र व प्रबोधनात्मक विचार मंथन या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात येणार आहेत. यासाठीच शिवव्याख्याते व राजमाता जिजाऊ यांचे वंशज श्री नामदेवराव जाधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

तरी याचा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमी व मराठी भाषिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यात दहावीच्या वर्गात पहिला क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व तालुक्यात क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व अतिदुर्गम भागात जाण्या येण्यासाठी रस्ता नसलेल्या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलेल्या शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. समारंभ बाळेवाडी मठाचे मठाधीश पिर सिंगनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात आहे कार्यक्रमात उपस्थित त्यांचे स्वागत चापगाव ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व स्वागत कमिटीचे सदस्य रमेश धबाले यांनी केले. यावेळी मुकुंदराव पाटील सामाजिक कार्यकर्ते शिवोली, नगरसेवक विनोद पाटील,समिती कार्यकर्ते सदानंद पाटील, कौंदलचे सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले अभिजीत सरदेसाई, मणतुर्गे गावचे प्रल्हाद मादार, व ईश्वर बोभाटे, यशोधन सरदेसाई, जय भातकांडे आधी जण उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us