खानापूर : एक नोव्हेंबर काळादिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित केली आहे. काळा दिन संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीला खानापूर तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us