- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील साठी ओलांडलेल्या वृद्धांच्या साठी संघटनात्मक काम करून उतार वयात त्यांचा आधार बनणे त्यांच्या आणि अडचणी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवून बुद्धांना धीर देणे व संघटना तक काम मजबूत करत भविष्यात वृद्धांच्या सुखकर सोयी तथा विविध धोरणे ठरवून त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दि. 08जुलै,2024 रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी
- जुलै महिन्याची सर्वसाधारण मासिक बैठक बोलाविले आहे सर्व सभासदांनी व संघटना कमिटी मेंबर यांच्या समवेत खालील विषयावर बैठक बोलाविण्यात आली आहे
- 1/स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन याबाबत
- 2/प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणे बाबत
- 3/कार्याचे विकेंद्रीकरण व विभागीय अधिकरण विस्ताराबाबत
- 4/आर्थिक धोरण ठरविणे बाबत
- इतर विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेण्यात येतील यशस्वी सभासद व उत्कृष्ट मार्गदर्शक यांचा सन्मान व आदर करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आपले आद्य कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून बैठक यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील कार्य करण्याचे आहे असे आवाहन संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री पवार सर व अध्यक्ष श्री बनोसी सर यांनी केले आहे