खानापूर /प्रतिनिधी:
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांच्या मातोश्री
श्रीमती पद्मावती बळवंतराव देसाई वय १०६ वर्षे, रा. तिवोली देसाईवाडा यांचे आज दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ठीक साडेपाच वाजता तिवोली देसाईवाडा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात चार कर्ते विवाहित चिरंजीव, दोन विवाहित कन्या, सूना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.