खानापुर लाईव्ह new/प्रतिनिधी ;
करसवाडा म्हापसा गोवा येथे रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी 3 किलोमीटर खुला गटा मध्ये 50 वर्षावरील गटामध्ये तोपिनकट्टी गावचे सुपुत्र श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर (वय 54) यांनी प्रथम क्रमांक सुवर्णपदक मिळविले
श्री तिरवीर व्यवसाय निमित्त कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. यांची प्राथमिक माध्यमिक शिक्षण तोपिनकट्टी येथे झाले. कोल्हापूर या ठिकाणी सतत प्रयत्न करून ज्योती क्लब बेळगाव यांच्या सानिध्यात गर्लगुंजी गावचे क्लबचे संस्थापक वरिष्ठ जेस्ट कोच श्री एल जी कोलेकर सर व श्रीयुत एल डी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे ते स्नेही आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र गौरव अभिनंदन होत आहे. एक 54 वर्षाचा प्रौढ सातत्याने या वर्षात 50 पेक्षा अधिक सुवर्णपदके मिळविले आहेत.यांचे भाऊ श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिंणकट्टी संस्थेचे संस्थापक डायरेक्टर आहे. यांचीही समर्थ साथ तसेच गर्लगुंजी गावचे खोखो कोच श्री ए जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.