18 वर्षाखालील गटात ज्ञानदेव शिंदे, पूजा हलगेकर तर 14 वर्षाखालील गटात सोमनाथ हलगेकर, प्रियंका देवलतकर प्रथम!
खानापूर लाईव्ह/न्यूज: प्रतिनिधी:
- खानापूर तोपीनकट्टी महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात अबनाळीचा अनंत गावकर, खुल्या महिलां गटात शुभांगी हलगेकर प्रथम ,
- 18 वर्षाखालील गटात ज्ञानदेव शिंदे, पूजा हलगेकर तर 14 वर्षाखालील गटात सोमनाथ हलगेकर, प्रियंका देवलतकर प्रथम यांनी पटकावला आहे. तर यावर्षीचे चॅम्पियनशिप गर्लगुंजी माऊली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकवले आहे. स्पर्धांचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील 18 वर्षाखालील व ओपन अशा एक हजारो अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता मुलांचा गट व मुलींचा गट असा वेगळा गट करून स्पर्धा राबविण्यात आली. शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्राचार्य स्वाती कमल फाटक यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्देश मांडले. यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले गेल्या आठ वर्षापासून शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये या मॅरेथॉन स्पर्धा भरवून तालुक्यातील होतकरूंना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले जात आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी व पालकांनी दिलेला प्रतिसाद हा उल्लेखनीय असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला.
- स्पर्धा संपल्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह महालक्ष्मी ग्रुप संचालक मंडळ,तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी रोख बक्षिसे ,प्रमाणपत्र, देऊन विजेत्या स्पर्धा करताना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल करमळकर शांती निकेतन पब्लिक स्कूलचे सचिव आर एस पाटील, पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, पिराजी कुराडे, यासह संचालक मंडळ उपस्थित होते. आभार मनीषा हलगेकर यांनी मांडले.
- या स्पर्धेत खुल्या पुरुष गटात प्रथम क्रमांक अनंत गावकर, अबनाळी. व्यंकट घाडी, गुंजी. गोपाल दावतार, बिडी. तर खुल्या मुलींच्या गटात शुभांगी हलगेकर, गव्हर्मेंट कॉलेज खानापूर. सानिका हंगिरकर, ताराराणी कॉलेज खानापूर. स्नेहल गोरल, न्यू PVC कॉलेज खानापूर. यांनी विजयी पटकाविला. तर 18 वर्षाखालील पुरुष गटात ज्ञानदेव शिंदे खानापूर. वेदांत होसुरकर, खानापूर. परसराम सावंत, आमटे यांनी तर मुलींच्या गटात प्रियांका हंगीरकर, महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी. सरस्वती वडेबैलकर माऊली विद्यालय गर्लगुंजी. श्रेया कोलेकर, माऊली विद्यालय गर्लगुंजी यांनी मिळवली आहेत. तर 14 खालील मुलांच्या सोमनाथ हंगिरकर, तोपिनकट्टी महांतेश पाटील, ओलमणी वैभव गोरे, गर्लगुंजी या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले आहेत तर मुलींच्या गटात प्रियंका देवलकर, येडोगा. गायत्री मेलगे, गर्लगुंजी. भक्ती देवलकर, येडोगा यांनी विजय मिळविला आहे.