Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

शहराच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाची गरज लक्षात घेता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात यावी अशी मागणी कमिशनर यांच्याकडे केली आहे . या मागणीची दखल घेऊन लवकरच खानापुरात मराठी माध्यमिक विद्यालय सुरू होणार अशी अशा त्यांनी व्यक्त केली. येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सरकारी शाळेच्या ठिकाणी मराठी माध्यमाचे विद्यालय सुरू करण्यासाठी कर्नाटक शिक्षण खात्याकडून परवानगी मिळताच यावर्षीपासून सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. गुरुवारी खानापूर येथील कृषी खात्याच्या वतीने भात बी- बियाणे वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी खानापूरचे गट शिक्षण अधिकारी रामाप्पा अक्षर दासोह अधिकारी महंतेश कित्तूर, बीईओ कार्यालयातील सहाय्यक अधिकारी शंकर कमार, कृषी सहाय्यक निर्देशक सतीश माविनकोप, खानापूर सरकारी पदवीपूर्व कॉलेज चे उपाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी कन्नड माध्यमिक विद्यालयाची संख्या अधिक आहे. मात्र सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाची कमतरता आहे, आतापर्यंत शिरोली,जांबोटी,निलावडे,गुंजी या ग्रामीण तसेच दुर्गम भागात गरजेचे ठिकाणी मराठी माध्यमाची विद्यालय सुरू आहेत. मात्र खानापूर शहराच्या ठिकाणी अत्यंत जरुरीचे असलेले मराठी माध्यमिक विद्यालय नसल्याने परिसरातील सातवी नंतरच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना खाजगी शाळांचा आधार घ्यावा लागत आहे . त्यामुळे सरकारी सुविधा मिळवताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती. या संदर्भात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची दखल घेऊन बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विभागाला सुरुवात करण्यासाठी कमिशनर यांच्याकडे प्रस्ताव केला आहे येत्या दोन दिवसात आमदार विठ्ठल हलगेकर कमिशनर यांची भेट घेऊन यावर्षीपासून सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. सदर माध्यमिक विद्यालय खानापूर तालुक्याच्या ठिकाणी गट शिक्षणाधिक कार्यालयाच्या बाजूला सरकारी कन्नड माध्यमिक विद्यालय यापूर्वीपासून सुसज इमारतीत सुरू आहे. त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. खानापूर शहराच्या ठिकाणी या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी सरकारी माध्यमिक विद्यालयाला प्रारंभ झाल्यास मराठी भाषिकातून समाधान व्यक्त होत आहे.


खानापूर तालुक्यात 463 अतिथी शिक्षक!

तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षांपासून शिक्षकांची कमतरता लक्षात घेता अतिथी शिक्षकांच्या वर शिक्षण खात्याने अधिक भर दिला आहे त्यामुळे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेता 463 अतिथी शिक्षक नेमणुकीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अतिथी शिक्षक शिक्षक नेमणूक ही कोणत्याही विषयाला आधारित डी.एड धारकांना केली जात होती. मात्र यावर्षी ही नेमणूक विषयाला अनुसरून डी.एड धारकांना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या गावच्या शाळेत मुख्य विषयाचे शिक्षक नाहीत त्या ठिकाणी अशा ठिकाणी त्याच विषयाचे अतिथी शिक्षकांना नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे अनेक शाळा विषयाला अनुसरून शिक्षकांची समस्या दूर होणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us