खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी असली तरी हा समाज एकत्रित नसल्याने विखुरला गेला आहे. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप व काँग्रेस नेहमीच मराठा मतदारांची मदत घेतली जात आहे. मात्र या मतदाराना न्याय मिळवून दिले जात नाही. राज्यामध्ये 50 लाखापेक्षा अधिक मराठा समाजाची संख्या आहे. मात्र या समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून न्याय देण्यात आलेला नाही. केवळ मराठा समाजाचा मतदानासाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व राजकीय पक्षांना आपल्या अस्तित्व दाखवून देण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा मतदारसंघातून राष्ट्रीय मराठा पार्टी उमेदवार उभे केले जाणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीचे उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी बेळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजातील नेत्यांना कोणत्याही पदावर स्थान देण्यात आलेले नाही त्यांना राजकीयरीत्या पुढे येण्यासाठी वाव देण्यात देण्यात येत नाही समाजातील नेत्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती मात्र याची दखल घेण्यात आली नाही यापूर्वी अनेक वेळा राजकीय स्तरावर मराठा समाजाला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. उत्तर कर्नाटकामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि संघटित हे आहे यासाठी उत्तर कर्नाटकावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून बेळगाव,चिकोडी, कारवार, बिदर, हावेरी , बागलकोट, शिवमोगा, विजापूर,धारवाड या लोकसभा मतदारसंघातून आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी एडवोकेट ईश्वर घाडी विनोद साळुंखे आधी उपस्थित होते.