एक नवलच…….
चापगाव/ प्रतिनिधी:
कोण कधी काय करेल, समाजात कधी आणि कशा प्रकारची माणसे भेटतील हे सांगणे कठीण आहे. कधी कोणी जाणीवपूर्वक तर कोणी एखाद्याच्या रागाने किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने मनोरुग्ण अवस्थेत कोण काय करेल हे सांगणे कठीण जाते. अशाच प्रकारे चापगाव येथे शेतवडीत जाणाऱ्या काही रस्त्यावर लाकडाच्या काठीला खिळे मारून वाहने जाण्याच्या ठिकाणी ती मातीत रुदवून वाहने पंचर करण्याचा सपाटा एका अज्ञात मनोरुग्णाने सुरू केला आहे. प्रामुख्याने नदीकडे जाणाऱ्या दोन-तीन रस्त्यावर हा प्रकार कायम सुरू आहे.हे कृत कोण करत आहे, याचा संशय असला तरी तो कृत करताना सापडत नसल्याने कठीण झाले आहे.
गेल्या सात आठ महिन्यापासून अनेक वेळा या संदर्भात गावात पंच कमिटीत चर्चा झाली. मंदिरात गाऱ्हाणा झाला, पण त्या मनोरुग्णाची मानसिकता सुधारली नाही. त्यामुळे शेतवाडीकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहने ट्रॅक्टर धारकांची मोठी गोची झाली आहे. त्या मनोरुग्णाचा तपास कसा करावा, यासाठीही अनेक वेळा गावातील युवकांनी मोहीम आखली. तरीही देखील त्या मनोरुग्णाने आपला सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे शनिवारी सायंकाळी गावातील 40 हून अधिक युवकांनी एकत्रित येऊन गावात घरोघरी जो कोण मनोरुग्ण असे कृत करत आहे, त्याला धडा शिकवण्यासाठी मोहीम आखली आहे. श्री फोंडेश्वर मंदिरात एकत्रित येऊन देवाकडे साकडे घालून त्या मनोरुग्णाला धडा शिकवण्यासाठी अभियान राबवले आहे.
खरंतर,मानसिक संतुलन बिघडल्याने मनोरुग्ण व्यक्ती काय करेल सांगता येत नाही, लोकात मनोरुग्ण व्यक्ती दिसायला शांत आणि स्वच्छ दिसतात, पण पाठीमागचे कृत मात्र त्यांचे वेगळेच असते. रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंचर करण्याची ही कृती निषेधार्थ आहे. अशाच प्रकारे चापगाव पासून जवळच्या एका गावात गेल्या सात आठ महिन्यापूर्वी असाच एका मनोरुग्ण वेगळाच प्रताप केल्याने चांगलीच चर्चा झाली होती. त्या मनोरुग्ण युवकाने गावातील लोकांच्या परसातील कपडे कात्रीने कापणे, एका महिलेची वस्त्रे दुसऱ्याच्या घरात टाकणं व भांडण लावणे असे प्रकार घडले होते. सीसीटीव्ही कॅमेरात प्रकार दिसून आल्यानंतर त्याची चांगलीच खरडपट्टी त्या ग्रामस्थांनी केली. आणि त्याची गावातून हकलपट्टी केली. हे नवलच नाही का?