IMG_20240411_200954

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील मणतूर्गे येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थ पंच कमिटीने हाती घेतला असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सदर मंदिराचा कॉलम भरणे उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री चंद्रकांत बाजीराव पाटील व सौ. कांता चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते पायाभरणी समारंभ पौरोहीत दिपक चिटणीस यांच्या मंत्रपठणाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री राजाराम रवळू पाटील होते.

श्री रवळनाथ मंदिर हे गावचे ग्रामदैवत मानले जाते मंदिराचा जिर्णोद्धार हाती घेऊन लवकरात लवकर मंदिर पूर्णतः आणण्यासाठी ग्रामस्थ कमिटीने निर्णय घेतला असून त्याला अनेक देणगीदारांची साथ ही मिळाली आहे. आज झालेल्या कार्यक्रमात अनेक देणगीदार व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व अनेकांनी आपल्या देणगीही जाहीर केल्या.

या प्रसंगी मणतुर्गे पंचकमिटीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर रघूनाथ पाटील, कार्याध्यक्ष श्री प्रदीप परशराम पाटील, उपाध्यक्ष श्री सुभाष गणपती पाटील, उपसेक्रेटरी श्री संजय शिवाजी देवलतकर, पंचकमिटी सदस्य व गावचे पुजारी श्री मष्णू नागेश गुरव, श्री परशराम तुकाराम देवलतकर, लैला शुगरचे मॅनेजर श्री बाळासाहेब महादेव शेलार, निवृत्त पोस्टमास्तर श्री मारुती नारायणराव दळवी, श्री रामचंद्र श्रीपाद पाटील, श्री बळीराम बाळकृष्ण देसाई, श्री मनोहर अनंत गुंडपीकर, श्री श्रीपाद महादेव देवकरी माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री प्रेमानंद कल्लाप्पा पाटील, श्री रामलिंग विठोबा चोर्लेकर, श्री गजानन विष्णू गुरव, श्री हणमंत महादेव पाटील, श्री ज्योतिबा दत्तू गुरव, त्याचप्रमाणे श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटी सदस्य श्री मल्लाप्पा धाकलू देवलतकर, श्री कलमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाश नारायण पाटील, श्री दत्तू नारायण पाटील, श्री नामदेव गुंडू गुरव, श्री प्रभाकर नागाप्पा बोबाटे, श्री मर्‍याप्पा रावबा देवकरी, श्री बळवंत महादेव देसाई, श्री दिपक महादेव पाटील, श्री विजय दत्तू भटवाडकर. या कार्यक्रमाचे आयोजन रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री आबासाहेब नारायणराव दळवी राष्ट्रपती आदर्श शिक्षक व सरचिटणीस खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, सेक्रेटरी श्री प्रकाश नारायण गुरव, खजिनदार श्री शांताराम बाजीराव पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले. यावेळी मंदिर उभारणीसाठी माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री विशालराव अशोकराव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य व लैला शुगरचे मॅनेजर श्री बाळासाहेब महादेव शेलार व सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्णाजी सांबरेकर, श्री कृष्णाजी देवलतकर, जिल्हा आदर्श शिक्षक श्री मष्णू विठोबा चोर्लेकर इत्यादींनी मंदिर उभारणी संदर्भात आपले विचार मांडले. यावेळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी भरीव अशी देणगी देऊ केली. यावेळी जीर्णोद्धार कमिटी, पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा फेटा व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषण श्री राजाराम रवळू पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार श्री कृष्णाजी सांबरेकर यांनी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us