खानापुर: मनतूर्गा ग्रामपंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यामध्ये चुरशीने झालेल्या निवडणुकीत सुरेश नामदेव सुळकर हे विजयी झाले. अध्यक्षपदाचा मान पटकावला आहे. तर उपाध्यक्षपदी शांता आप्पाजी मादार या निवडून आल्या आहेत.
या ग्रामपंचायतीवर एकूण 11 सदस्य आहेत. अध्यक्षपदाची जागा सामान्य गटा करता आल्याने ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण याकडे संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते त्यामुळे बरीच चढाओढ निर्माण झाल्याने परस्पर दोन गट निर्माण झाले यामध्ये सुरेश सुळकर यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन आपल्या बाजूने बहुमत कायम ठेवले या ग्रामपंचायतीवर एकूण 11 सदस्य आहेत त्यापैकी एक सदस्य या निवडणुकीत गैरहजर राहिल्याने दहा सदस्यात निवडणूक झाली. यामध्ये अध्यक्षपदी सुरेश सुळकर व उपाध्यक्ष शांता मादार यांच्या पॅनलने 6 मते घेतली. तर विरोधी पॅनलने 4 मते घेतले. नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश सुळकर यांच्या पत्नी सुरेखा सुरेश सुळकर यापूर्वी या ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. पुन्हा सुरेश सुळकर यांनी ग्रामपंचायतीवर अध्यक्षपद मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्या नंतर त्यांचे अनेक समर्थ कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पर घालून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाने व गावातील नागरिकांनी अभिवादन केले.