36 वर्षे पुरुषाचं पोट फुगलं. डॉक्टरांना पोटात ट्युमर असावं असं वाटलं पण खरंतर त्याच्या पोटात बाळ होतं.
नवी दिल्ली ; सामान्यपणे महिला प्रेग्नंट होतात. पण तुम्ही कधी पुरुष प्रेग्नंट असल्याचं ऐकलं आहे का? असंच एक प्रकरण समोर आलं आहे ते भारतातील नागपुरात . नागपुरातील एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्षे प्रेग्नंट होता. 9 महिन्यांऐवजी 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला. प्रेग्नन्सीचं हे अजब प्रकरण पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला. त्या व्यक्तीने जुळ्यांना जन्म दिल्याचे कळते.
संजू भगत असं या व्यक्तीचं नाव. लहानपणापासूनच त्याचं पोट सामान्य मुलांपेक्षा वेगळं होतं. ते फुगलेलं होतं. पण त्याच्या कुटुंबाने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण हळूहळू पोट खूपच वाढू लागलं. तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबांना काळजी वाटू लागली. 36 वर्षांत त्याचं पोट असं फुगलं की ते 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेसारखे दिसू लागलं. पण खरंच त्याच्याही पोटात बाळ होतं, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता…….?