IMG_20240425_161034

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:

  • गोवा लोंढा मार्गे बेळगावला सुसाट जाणाऱ्या एका महिंद्रा XUV500 या कारचा टायर फुटल्याने एका दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह कार मधील एकजण असे दोघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या दरम्यान खानापूर गणेबेल दरम्यान आयटीआय कॉलेज जवळ घडली.
  • सदर अपघात इतका भीषण होता की, लोंढ्या कडून बेळगाव कडे जाणारी महिंद्रा एक्स यू कार चा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण तुटले. दरम्यान खानापूर शहरातून बायपास रस्त्याने बेळगावकडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वारकाला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महिंद्रा XUV500 कार रस्त्याकडे चार ते पाच पलट्या खाल्याने तिचा चेंदामेंदा झाला. या कार मधील एक जण गंभीर अवस्थेत बेळगावला घेऊन जात असताना ठार झाला आहे. अन चौघे जर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे. तर आणखी चार जण कार मधील जखमी झाले आहेत. घटनास्थळी खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस गुन्हे विभागाचे पोलीस गिरीश एम , पोलीस निरीक्षक बिराजदार, पीएसआय चनबसपणावर, हवालदार जयराम सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतांची ओळख पटवली.
  • या अपघातात ठार झालेल्या द्विचकी सरकारचे नाव रमेश अशोक पाटील भेंडवाड रायबाग असे आहे सदर रमेश हा सगुना फूड्स कंपनीमध्ये विभागीय मॅनेजर म्हणून काम करत होता तो खानापूर तालुक्यात पोल्ट्री कंपन्यांना भेट देण्यासाठी आला होता. तर लोंढ्याहून बेळगाव कडे जाणाऱ्या KA 22ML6970 या महिंद्रा XVU 500 या कार मधील एक जण गंभीर अवस्थेत असताना बेळगावला घेऊन जात असताना तो जागीच ठार झाला समिन पिरजादे असे आहे . सदर मयत कलाईगार गल्ली बेळगाव येथील असल्याचे समजते. घटनास्थळी आमदार विठ्ठल हलगेकर भाजपा अध्यक्ष संजय कुमार वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी आदींनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पोलिसांना सहकार्य केले.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us