फोटो : रामलिंगेश्वर मंदिर
खानापूर : तीर्थकुंडे ता. खानापूर येथील श्री रामलिंगेश्वर मंदिरात सोमवार दि. 26 रोजी अभिषेक, पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रावणी सोमवार उत्सव समितीने केले आहे.
श्रीराम लिंगेश्वर मंदिर हे स्वयंभू तीर्थक्षेत्र आहे. तीर्थकुंडये गावापासून एक किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या स्वयंभू मंदिरातून निरंतर पाण्याचा झरा वाहतो. यामुळे या गावासह परिसरात बारमाही पाणी या मंदिराच्या पायथ्यातून वाहते. या मंदिराची सर्वदूर ख्याती असल्याने सुमारे 5000 हून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहतात.