
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

2025 फेब्रुवारी हा खानापूर तालुक्यातील नंदगड तसेच सन्नहोसूर व भंडरगाळी गावांशी संबंधित दोन महालक्ष्मी देवींचा उत्सव मोठ्या आनंदात व हर हर महादेव च्या गजरात बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बुधवारचा दिवस खानापूर तालुक्यात एक आनंदी व उत्साही वातावरणाचा ठरला.
नंदगड येथे ऐतिहासिक उत्सव!

खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक वसा लाभलेल्या नंदगड गावातील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव बुधवारी पहाटेपासून जल्लोषात सुरू झाला आहे. पहाटे सूर्योदयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी सात वाजून ११ मिनिटांनी देवीच्या अक्षता रोपण पार पडल्या. गावच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मी देवी मंदिराच्या आवारात देवीचा विवाह सोहळा पूर्वहितांच्या तसेच यजमान व बनकर यांच्या हक्क परंपरेप्रमाणे पार पडला. मंगलाष्टके व धार्मिक विधी पार पडल्या. या देवीच्या विवाह सोहळ्यासाठी खानापूर तालुक्याच्या विविध भागातून जवळपास 25 हजार हून अधिक भाविकांनी सहभाग दर्शवला होता. ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या विवाह स्थळाच्या मंदिर जवळ जागा अपुरी असल्याने विवाह सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गल्लीमध्ये डिजिटल स्क्रीन बसवण्यात आले होते. या स्क्रीनच्या द्वारे अनेकाने लक्ष्मी देवीच्या विवाह सोहळ्याचा आनंद लुटला.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार व एआयसीच्या सचिव डॉ.अंजली निंबाळकर यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग दर्शविला. यावेळी यात्रा कमिटीचे कोषाध्यक्ष माजी आमदार अरविंद पाटील यांनी उपस्थित यांचे स्वागत करून या यात्रा उत्सवाच्या नियोजनाबद्दल माहिती दिली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडल्या. यावेळी बनकर मंडळी, हकदार मंडळी, मादार मंडळी यांनी रीतीरी वाजाप्रमाणे आपली जबाबदारी पार पडली. त्यानंतर लक्ष्मी देवीला सिंगीचे लाकडी दांडगे बांधून देवीला मिरवणुकीसाठी सजवण्यात आले. त्यानंतर हर हर महादेव, महालक्ष्मी माता की जय घोषणा परिसरात महालक्ष्मी देवीची मिरवणूक पार पडली. त्यानंतर गावातील देव देवतांच्या गाठीभेटी व बनकर मंडळी, हकदार मंडळींच्या ओट्या भरणी घेत महालक्ष्मी देवीची मिरवणूक अनेक विभागातून निघाली. दुपारपर्यंत जुने नंदगड गावामध्ये देवीची मिरवणूक व, मोठ्या भरणी झाल्यानंतर दुपारी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या प्रांगणात देवीला विसावा झाला.

अशाप्रकारे शनिवार पर्यंत या देवीची मिरवणूक गावातील विविध भागात होणार आहे. यात्रा कमिटीच्या वतीने नंदगड गावात चारचाकी वाहनांना निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यालय तसेच पोलीस ठाण्याजवळ पोलीस बंदोबस्त होऊन शहरात चारचाकी वाहने जाण्यावर बंदी ठेवण्यात आली आहे. एकूणच गाव मोठे असल्याने बुधवारी सकाळी महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने विवाह सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना मात्र गावाबाहेर वाहने पार्किंग करून चालत जावे लागले व देवीचे दर्शन घ्यावे लागले.
सन्नहोसुर भंडरगाळी श्री महालक्ष्मी यात्रा उत्साहात प्रारंभ!

खानापूर: खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामदेवता लक्ष्मी यात्रे बरोबर तालुक्यातील सन्नहोसुर -भंडरगाळी या दोन्ही गावची ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रा देखील बुधवार दिनांक 12 पासून तब्बल नऊ दिवस भरवली जात आहे. एकाच वेळी तालुक्यात दोन महालक्ष्मी यात्रा आज पासून प्रारंभ झाल्याने एकच जल्लोष निर्माण झाला आहे. सन्न होसुर भंडरगाडी या गावची महालक्ष्मी यात्रा तब्बल 14 वर्षांनी भरत आहे यापूर्वी 2011 मध्ये सदर महालक्ष्मी यात्रा भरली होती. बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर भडजींच्या उपस्थितीत महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला गावच्या मध्यभागी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर व हनुमान मंदिरात देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला.

देवीचे मंदिर गावच्या मध्यभागी असल्याने आलेल्या भाविकांना विवाह सोहळ्याचे दर्शन घडावे यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती परंतु ढिसाळ नियोजनामुळे या स्क्रीन मधून लाईव्ह दर्शन मिळू शकले नाही त्यामुळे अनेकांची नाराजी पसरले. श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी आमदार विठ्ठल हलगेकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणी हलगेकर लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, पी के पी एस चे संचालक शंकर पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळराव देसाई, राजू सिद्धांनी, यास अनेक जण उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी सन्नहोसूर महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले .



