- खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी ;बेळगाव : येत्या 2024 च्या एप्रिल महिन्यात मडवाळ, कापोली गावासह, 24 गावच्या महालक्ष्मी यात्रा होणार आहे. खानापूर तालुक्यातील 24 गावांची मिळून होणारी सर्वात मोठी श्री महालक्ष्मी यात्रा असून या मुख्य मडवाळ गावाशी जोडणाऱ्या खेड्यापाड्यातील गावांचा विकास गावचे संपर्क रस्ते सह विद्युत पुरवठा पाण्याची सोय या गोष्टी तातडीने सोडवण्यात याव्यात याकरिता आमदार विठ्ठल हलगेकर सह भाजपच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अभियंता हर्षल भोयर यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले.
- या निवेदनात म्हटले आहे की,24 गावच्या मुलभूत सुविधा व समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच 24 गावांमध्ये पाण्याची समस्या असल्याने त्या ठिकाणी बोअरवेल मारण्याची मागणी करण्यात आली. तसेच बेळगाव जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना 24 गावांचा विकास लवकरात लवकर करण्यासाठी आपण लवकरात लवकर पाऊले उचलावीत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली
- यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी, खानापुर भाजपा अध्यक्ष श्री. संजय कुबल, खानापुर भाजपा जनरल सेक्रेटरी श्री.गुंडू तोपिंनकट्टी, बाबा देसाई, शरद देसाई , गजनान पाटील, मंगेश पाटील, व मडवाळ व लक्ष्मी यात्रा क्षेत्रात असलेल्या गावातील नागरीक उपस्थित होते.