- खानापूर लाईव्ह न्यूज/
- खानापूर तालुक्यातील मनतुर्गे गावचे सुपुत्र व आदर्श मुख्याध्यापक श्री मष्णू व्हि. चोर्लेकर यांना शिक्षक विकास परिषद शिरोडा गोवा त्यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षक भूषण राष्ट्रीय पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विकास परिषदेचे अध्यक्षआर व्हीं कुलकर्णी होते. यावेळी प्राध्यापकगौर सह अनेक मान्यवर आणि उपस्थिती दर्शवली होती. मष्णू चोरलेकर हे खानापूर तालुक्यातील मुडेवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर संगीत विशारद (तबला)पदवी प्राप्त नावलौकिकास पात्र ठरले आहेत. हे उत्तम शिक्षक व विविध क्षेत्रात प्राविण्यपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल खानापूर तालुक्यातील त्यांचे अभिनंदन होत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्री.आर.व्ही.कुलकर्णी व प्रो.गौर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.या गौरवाबद्दलबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.