IMG_20240723_113456

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

लोंढा-रामनगर मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकी वरून पडून जखमी झालेल्या महिला आशा कार्यकर्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. लक्ष्मी झरंबेकर (वय 45) रा. (घार्ली) मुंडवाड तालुका खानापूर असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या

बैठक आटोपून परत आपल्या गावाकडे जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना लिफ्ट दिली. त्यावेळी दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचली. जखमी अवस्थेत तातडीने रामनगर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण अधिक उपचारासाठी बेळगावला घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. खानापूर सरकारी दवाखान्यात मृतदेह ठेवण्यात आला असून याबाबत रामनगर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात झाली असून पुढील चौकशी रामनगर पोलीस करीत आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us