खानापूर: गेल्या दोन-तीन महिन्यात खानापूर तालुक्यात चोरीचे प्रकार दिसून आले नाहीत. त्यामुळे सार्वजनिकाने सुटकेचा निस्वास सोडला होता. मात्र दि. 9 रोजी रात्री लोकोळी येथील श्री रवळनाथ मंदिर मध्ये कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी गावातील पुजारी निंगोजी गुरव हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मंदिराचा कुलूप तोडल्याचे लक्षात आले. सदर चोरट्यानी मंदिरातील दोन मोठ्या समई, दानपेटी व लहान मोठ्या घंटा घेऊन पसारा केला आहे.सदर चोरीचा प्रकार घडल्याचे कळताच पुजारीणी गावातील पंच कमिटीला कळवले. व त्यानंतर खानापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवल्या. सदर चोरीचा प्रकार सराईत चोरट्याने की आणि कोणी केला आहे याचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे सदर घटनेचा पोलीस निरीक्षकांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.