माजी आमदार अरविंद पाटील वाढदिवस विषेश…….
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व, नंदगड मार्केटिंग सोसायटी चेअरमन माजी आमदार अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस सोहळा सर्व पक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते भाजप कार्यकर्ते व गौरव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खानापूर श्री मलप्रभा तालुका क्रीडांगणावर आज शुक्रवार दि 17 मार्च 2023 रोजी मठाधिपती (स्वामी), मंत्रीगण, खासदार, व जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीं व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे,
खानापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर बदलणारे वारे आज चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. तालुक्यात अनेक प्रभावी व्यक्तिमत्त्वांची खाण आहे. पण त्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून सर्वसामान्य जनतेची आपली नाळ जोडून सहकार क्षेत्राच्या उन्नती बरोबर भाषा संवर्धन हिंदुत्व अशा अनेक गोष्टी कटाक्षाने सांभाळत आज भारतीय जनता पार्टीमध्ये एक सक्षम प्रभावी व धाडसी, जनतेच्या अडीअडचणींना व वाईट प्रसंगी उपयोगी पडणारा व धावुन जाणारा नेता, म्हणून परिचित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अरविंद पाटील यांचे नाव आजही अग्रेसर आहे.
सहकार क्षेत्र ही त्यांची राजकीय नाळ श्रीमान अरविंद पाटील हे माजी आमदार स्वर्गीय अरविंद पाटील यांच्या शाळेत शिकलेले राजकीय पटू आहेत. प्रारंभीच्या काळात एक युवा नेतृत्व व एक क्रिकेटपटू म्हणून त्यांनी परिचित होते. कॉलेज जीवन संपल्यानंतर वडील प्राध्यापक सी.बी पाटील यांच्या कडक आणि शिस्तबद्ध मास्तरकी च्या धास्तीखाली वाढलेल्या अरविंद पाटील यांनी आपला वाळू व्यवसाय करता करता राजकीय पटलावर हळुवारपणे येण्यास सुरुवात केली. त्यांच्या धाडसी आणि सक्षम नेतृत्वाची जाण लक्षात घेता 2005 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले. खानापूर तालुक्यातून सहकार क्षेत्राचा उगवता तारा चर्चेत आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी रुजू झाल्यानंतर 2006 नंतर भारतीय जनता पार्टीच्या संमिश्र सरकारने कर्जमाफी धोरण राबवले अनेक बुडीत गेलेल्या पतसंस्थांना उर्जोतावस्था आली. त्यामुळे सतत 4 वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून अविरतपणे कार्य करत आले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या चार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दोन वेळा बिनविरोध आणि दोन वेळा विद्यमान आमदारांचा पराभूत करून त्यांनी बँकेवर निर्विवाद वर्चस्व साध्य केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ते आजही माहीर आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर खानापूर तालुक्यातील दुसरी अग्रगण्य संस्था नंदगड मार्केटिंग सोसायटी होय. या संस्थेवरील गेल्या वीस वर्षापासून निर्विवाद वर्चस्व ठेवून या संस्थेचा कारभार आज प्रगतीपथावर आणला आहे. आणि आज ते या संस्थेचे विद्यमान चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत. एकूणच त्यांच्या या कार्याची दखल लक्षात घेता राज्य सहकार खात्याच्या वतीने त्यांना या वर्षीचा ‘सहकार रत्न पुरस्कार’ देऊनही सन्मानित करण्यात आले.
आमदारकीच्या काळात अनेक कामे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावरून काम करता करता खानापूर तालुक्यात आठ कोटीच्या आर्थिक पतीला आज 80 कोटी पेक्षा जास्त भांडवल खानापूर तालुक्यात मंजूर करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे काम त्यांनी केले. आणि या त्यांच्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाची जाण मराठी भाषेत जनतेने घेऊन 2013 ते 2018 या कालावधीत त्यांना खानापूर तालुक्याचा आमदार म्हणून निवडून आणले. आणि खानापूर तालुक्यामध्ये एक इतिहास घडवला समितीच्या संघटना बळकटी बरोबर तालुक्यात विकास कामासाठी त्यांनी स्वतःला झुकून दिले, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार असतानाही समितीतील बेदिलकी मुळे पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे आपल्या राजकीय जीवनाची त्यांनी दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आणि वर्षभरापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आज भारतीय जनता पार्टीत एक सक्षम नेतृत्व म्हणून काम करत आले आहेत. आज आमदारकीसाठी भाजप पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी उमेदवारीसाठी विनवणी केली आहे.
अनेक कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्र एकीकरण समितीतून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर समितीतील कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत शिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आपले प्रस्थ स्थापन केल्यामुळे पूर्व भागातही त्यांना आपलं करणारी माणसे आहेत त्यामुळे अरविंद पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही यात शंका नाही.