खानापूर लाईव्ह न्युज :
खानापूर येथील ग्रहण समारंभ नुकताच थाटात संपन्न झाला. जिल्हा प्रांतपाल श्रीनिवास शिवनगी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष सागर उपीन यांचा अधिकार ग्रहण करण्यात आला. त्याचप्रमाणे सचिव बी एम हम्मनावर, खजिनदारपदी विजय हिरेमठ यांना पदे बहाल करण्यात आली.
श्रीनिवास शिवणगी म्हणाले, गेल्या 51 वर्षात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम लायन्स क्लब ने केले आहे. ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारून काम केले आहे. त्या सर्वांचे यावेळी कौतुक करण्यात आले. क्लबचे मावळचे अध्यक्ष भाऊराव चव्हाण , आर, सी सातेरी, पाटील , ओनपर्सन भारती, चीफ गेस्ट गंगाधर सी कोटगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कापोली हायस्कूलच्या विद्यार्थिनींना लायन्स क्लब तर्फे स्कूल युनिफॉर्म देण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते एस जी शिंदे, गुरुजी बी.बी. पाटील, अधिवक्ते देसाई, कल्लाप्पा घाडी, डॉ. डी पी वागळे, संभाजी पाटील, श्रीकांत मोरे, मोनिका सावंत आदी उपस्थित होते. लायन्स क्लब पदाधिकारी डॉ. आर एस हरवडेकर, अनिल पाटील, एम. जी बेनकट्टी व महेश पाटील, मदन देशपांडे सीबी होस मनी प्रकाश बेतगावडा, विकास कलघडगी, जुबेर तोपिनकट्टी, नमिता उपीण, निशा, श्रद्धा हरवडेकर आदी उपस्थित होते.