Screenshot_20240418_163912
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: कडाक्याच्या उन्हाने तापलेल्या जनतेला अवकाळी पावसाने थोडाफार दिलासा दिला. गुरुवारी दुपारी खानापूर शहरासह नंदगड भागात बऱ्यापैकी पाऊस झाला पण आज झालेला पाऊस म्हणजे वादळ जास्त पाऊस कमी अशी परिस्थिती दिसून आली.
  • ಖಾನಾಪುರ ನೇರಪ್ರಸಾರ ಸುದ್ದಿ/ಪ್ರತಿನಿಧಿ: ಸುಡು ಬಿಸಿಲಿನಿಂದ ಕಂಗೆಟ್ಟಿದ್ದ ಜನತೆಗೆ ಅಕಾಲಿಕ ಮಳೆ ಕೊಂಚ ನೆಮ್ಮದಿ ನೀಡಿದೆ. ಗುರುವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಖಾನಾಪುರ ನಗರ ಸೇರಿದಂತೆ ನಂದಗಢ ಭಾಗದಲ್ಲಿ ಧಾರಾಕಾರ ಮಳೆ ಸುರಿದಿದ್ದು, ಇಂದಿನ ಮಳೆಗೆ ಬಿರುಗಾಳಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆ ಕಡಿಮೆ ಎನ್ನುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ.
  • कसबा नंदगड येथे घराचे पत्रे उडून नुकसान
  • ಕಸ್ಬಾ ನಂದಗಢದಲ್ಲಿರುವ ಮನೆಗೆ ಎಲೆಗಳು ಹಾರಿ ಹಾನಿಯಾಗಿದೆ

  • कसबा नंदगड भागात झालेल्या वादळी पावसामुळे कसबा नंदगड येथील गंगाराम पुंडलिक पाटील यांच्या घराचे पत्रे उडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राहत्या घराचे संपूर्ण पत्रे उडून घरातच पडले. व संपूर्ण जीवन उपयोगी साहित्य त्यांचे नुकसान झाले आहे. गरीब परिस्थितीत वावरणाऱ्या गंगाराम पाटील त्यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ते आसरा हीन झाले आहेत. त्यासाठी तहसीलदारांनी तातडीने त्यांच्या घराची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे. या भागात झालेल्या वादळी पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला. उन्हाने तापलेल्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी पूरक पाऊस झाला नाही. खानापूर शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. दुपारच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसात बेळगाव खानापूर महामार्गावरील शहरांतर्गत मार्गावर जांबोटी क्रॉस म्हणजे एक भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. खानापूर परिसरात झालेला पाऊस हा खानापूर शहरा पुरताच मर्यादित दिसून आला. मात्र आजूबाजूला खेड्यापाड्यात या पावसाचा मोठा प्रभाव पडला नाही. एकंदरीत तासभरात आलेल्या वादळी पावसामुळे उन्हाने तापलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us