
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील आल्लेहोळ – हडलगा दरम्यान एका जंगली बिबट्याने मोठी दहशत माजली असून रात्रीच्या वेळी सदर बिबटा भर रस्तावर लोक वस्तीच्या परिसरात वावरत असल्याने येथील नागरिकात तसेच शेतकरी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून हाडलगा – रस्त्यावर सनदी फार्म तसेच परिसरात सदर बिबट्या रात्री आठच्या सुमारास सतत दोन ते तीन दिवस काहींच्या निदर्शनाला आला. रस्त्यावरच ठाण मांडल्याने दुचाकीच्या लाईटवर सदर बिबटा दिसून आल्याने एका दुच्याकीस्वारकाची तेथेच भिम्ब्री उडाली. अशातच रात्री सहा नंतर शेतवडीतून पुरवठा होणारा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतीवाडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अनेक वेळा हेस्कॉम खात्याला वीज पुरवठा करण्यासंदर्भात अर्ज विनंती करूनही याकडे हेस्कॉम खाते शेतीवाडीतून पुरवठा होणारा वीज पुरवठा केला जात नाही. रात्रीच्या वेळी किमान सिंगल फेस विजपुरवठा ठेवण्यात यावा अशी वारंवार मागणी करूनही खाते दुर्लक्षित आहे. त्यामुळे अशा जंगली प्राण्यांच्या परिसरात वावरणाऱ्या शेतकऱ्यास मोठी भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी अशा जंगली बिबट्यासह हिंस्त्र प्राण्याकडून काही घातपात झाल्यास याला जबाबदार हेस्काँम खातेच राहील असा सतर्कतेचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
चापगाव व परिसरात तसेच शिवोली, आलेहोळ, हडलगा, खैरवाड परिसरातील डोंगरी पट्ट्यात घनदाट झाडी आहे. शिवाय या ठिकाणी चापगाव तलावात पुरेपूर पाणी असल्याने या ठिकाणी अनेक जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यापासून या परिसरात एक बिबट्या चा वावर असल्याचे अनेक वेळा चर्चेत आले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या गोट्यातील शेळ्या, जनावरे हस्त केल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे सदर बिबट्या हा या भागात छुप्या मार्गाने दहशत घालत आहे. अनेक कुत्र्यांचा त्याने पडसा पडला आहे त्यामुळे सदर बिबट्या हा धोक्याची घंटा बनली आहे. सदर बिबट्याचा वावर दररोज रात्री सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत भर वस्तीच्या ठिकाणी फिरत आहे. येथील सनदी फार्म जवळ जवळपास 25 ते 30 कुटुंबे वास्तवात आहेत. रस्त्यावर वर्दळ ही असते पण सदर बिबट्या बिनधास्तपणे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वावरताना दिसत आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास अल्लेहोल येथील एका शेतकऱ्याला सदर बिबट्या एका झुडपात बसलेला दिसून आला. त्याने धाडसाने त्या बिबट्याला बॅटरी मारून त्याचा व्हिडिओही टिपला आहे. खानापूर इस्कॉन खाते दुर्लक्षित खानापूर हॅस्काम खात्याच्या वतीने नंदगड विभागातून या भागात वीज पुरवठा केला जातो. परंतु शेतीवाडीतील पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित केला जात असल्याने शेतीवाडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात अशा जंगली प्राण्यापासून जगावे कसे असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. यासाठी सायंकाळी सहा नंतर सिंगल फेज पुरवठा हेस्कॉम खात्याने चालू ठेवावा अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाने केली आहे.