- पाकिस्तानातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा आणखी एका मोठा शत्रू असलेल्या दहशतवाद्याची पाकिस्तानमधील कराचीमध्ये अज्ञात लोकांनी हत्या केली आहे.
- मुफ्ती कैसर फारुख असे हत्या झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मुफ्ती कैसर फारुख कुठेतरी जात असताना अज्ञातांनी त्याची हत्या केली.
- मुफ्ती कैसर फारुख हा भारतविरोधी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक होता आणि प्रमुख हाफिज सईदच्या जवळचा होता. मुफ्ती कैसर फारुख याची हत्या हाफिज सईदसाठी मोठा धक्का ठरणार हे नक्की.
भारताचा वॉन्टेड दहशतवादी
- मुफ्ती कैसर फारुख याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये काही लोक रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला मुफ्ती कैसर फारूकही मागे दिसत आहे.
- यावेळी काही अज्ञात लोक कैसर फारुखवर अचानक गोळ्या झाडू लागतात. कैसर फारुखने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. हल्लेखोरांच्या गोळ्या लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत रस्त्यावरून चालणारे सर्व लोक गोळीबार होताना पाहून जीव वाचवण्यासाठी धावू लागले होते.
- मुफ्ती कैसर फारुख हा भारताचा वॉन्टेड दहशतवादी होता. तो पाकिस्तानात राहत असल्याने त्याला आतापर्यंत पकडता आले नव्हते.