खानापूर/ प्रतिनिधी : कुपटगिरी ता. खानापूर येथील आदर्श शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील यांना यावर्षीचा गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा “आदर्श कृषी व धार्मिक गौरव” हा राष्ट्रीय पातळीवर पातळीवरील गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी दरवर्षी दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,गुजरात, गोवा या राज्यातून विशेष प्रतिनिधींची निवड केली जाते. यानुसार सदर संघटनेने कर्नाटकातून मल्लाप्पा नारायण पाटील यांच्या कृषी विषयक कामाची दखल लक्षात घेता त्यांना आदर्श कृषी व धार्मिक पुरस्कार देऊन करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना कृषी विभागाचे अनेक जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. खानापूर तालुक्यात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. शेतीविषयक त्यांनी स्वतःच्या अनुभवातून पीक उत्पादनात विशेष महत्त्व राखले आहे. या कार्याची दखल घेता सदर संस्थेने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सासनुर तसेच माजी केंद्रीय कायदामंत्री इराप्पा मोहिली यांच्या हस्ते गोवा येथील करण्यात आला आहे. यावेळी पंचक्रोशी शिक्षण मंडळ तसेच नॅशनल रोलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंटिग्रेटेड सोसायटीचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. श्रीयुत मल्लाप्पा पाटील हे लैला साखर कारखान्यात एक वजन काटा प्रतिनिधी म्हणून गेल्या दोन-तीन वर्षापासून कार्य करत आहेत. कमी शेतीत अधिक उत्पादन व नफा मिळवण्यात ते नेहमी अग्रेसर असतात म्हणून त्यांच्या शेतीविषयक कार्याचा गौरव होत आहे.