कुद्रेमनी: दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कुद्रेमानी हायस्कूल कुद्रेमानी येथे इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री ईश्वर गुरव होते.
2023 व 2024 या शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक वाटचाल विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यासंदर्भात हा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एम बी शेडबाळे यांनी उपस्थित पालकांचे शाळा सुधारणामंडळाचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एम बी शेडबाळे सरांनी मुलांची हजेरी मुलांचा नियमित अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत असे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री शिवाजी शिंदे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमतरता न करता वेळोवेळी लागणारे साहित्य उपलब्ध पालकांनी करून दिले पाहिजे मुलांनी अभ्यासात नियमित प्रगती करत आली पाहिजे असे सांगितले श्री शंकर पाटील माजी एसडीएमसी अध्यक्ष प्राथमिक सरकारी शाळा कुद्रेमानी यांनी मुलांना आपले भविष्य यशस्वीरित्या घडवावे असा सल्ला दिला. यासाठी शिक्षकांचे लागेल ते मार्गदर्शन मिळवून घ्यावे असे सांगितले. यावेळी बहु संख्येने पालक उपस्थित होते. यावेळी 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील एन एम एम एस या परीक्षेत यश मिळवलेली व 48 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवलेली कुमारी सई शिवाजी शिंदे हिचा सत्कार शाळा सुधारणा मंडळाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा सुधारणामंडळाचे सदस्य श्री परशुराम खिरु गोवेकर श्री गुंडू पाटील श्री एम पी गुरव श्री जे एस पाटील उपस्थित होते. सहशिक्षक एम ओ कोकितकर व संजय जी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे एन खन्नूकर व उपस्थित पालकांचे आभार श्री सुहास गुरव सर यांनी मानले