खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सोमवार दि. 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याने खानापूर तालुक्यातील कौंदल येथे सायंकाळी प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेची शोभायात्रा व श्री माऊली देवी प्रवेशद्वाराचा उद्घाटन समारंभ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दुपारी 2 ते 4 पर्यंत श्री माऊली देवी प्रवेशद्वाराच्या स्वागतकमानीचा उद्घाटन कार्यक्रम होईल. त्यानंतर गावातून श्री प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची शोभायात्रा केली जाणार आहे. शिवाय महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रम महाप्रसाद आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पूज्य श्री चन्न बसव देवरू यांच्या दिव्य सानिध्यात आमदार माजी आमदार अरविंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका द संजय कुबल, खानापूर बँकेचे संचालक मारुती पाटील सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी याचा सार्वजनिक आणि लाभ घ्यावा असे आवाहन कौंदल ग्रामस्थ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.