IMG_20230407_152039

खानापूर: प्रतिनिधी: निवडणूक आयोगाने अनेक कडक निर्बंध घालून निवडणूक प्रचार अथवा बॅनर बाजीवर करडी नजर ठेवली आहे.खानापूर शहरात बेळगाव पणजी शहरांतर्गत महामार्गावरील पेट्रोल पंप च्या बाजूला असलेल्यम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेला नामफलक देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपला. शुक्रवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या एका पथकाने येऊन लावण्यात आलेला नामफलक काढण्याची सक्ती केली.

वास्तविक निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार निर्बंध राखणे योग्य आहे. पण एखाद्या कार्यालयाच्या समोर नगरपंचायतीची परवानगी घेऊन लावण्यात आलेला फलक हा अवैध कसा ठरू शकतो, असा जॉब यावेळी समिती कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्यांना केला. अद्याप कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचार मोहीम नाही, त्यामुळे कार्यालयाची ओळख ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालय असा नाम फलक लावण्यात आला आहे असे सांगितले, असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी सोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन तो नामफलक हटवण्याची घाई केली. त्यामुळे उपस्थित समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी निवडणूक आयोगाच्या नियमावली संदर्भात बोलताना कृषी सहाय्यक निर्देशक डी बी चव्हाण, हेस्कॉम खात्याचा कार्यकारी अभियंता कल्पना तिरविर यांनी नियमावलीचे आपण पालन करत असून निवडणूक आयोगाच्या चौकटीत असलेल्या आकाराप्रमाणे आपण नामफलक बसवावा व यासाठी रीतसर निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी व त्यानंतरच फलक बसवावा असे सांगितले. व तो फलक काढलाच.

पंधरादिवसांपूर्वी अशाच प्रकारे समिती कार्यालयासमोर लावण्यात आलेला हा फलक नगरपंचायतीने हटवला होता. त्यावेळी अधिकृत परवाना नव्हता, ते ठीक होते. पण आता नाम फलक परवाना घेऊन ही त्या फलकाला आता निवडणूक आयोगाच्या चौकटीतील आकाराप्रमाणेच नामफलक बसवा अशी सक्त सूचना त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us