खानापूर/ प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला अवकाळी पावसाने शुक्रवारी दिलासा दिला. शहर परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जोराचा वारा व थंड गारवा सह पावसाने तब्बल पाऊण तास जोरदार हजेरी लावली. गेल्या नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाने पाठ फिरवल्याने फिरवल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला होता. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नदि,नाल्यांचे पाणी कमी होऊन उन्हाळी पिकांना कठीण जात होते. पण अवकाळी पावसाने शुक्रवारी जोरात सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. खानापूर शहर परिसरात असलेल्या शेतकरी चांगला ओलावा झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी पूर्व मजाकतीची कामे हाती घेण्यास मदत झाली आहे.सध्या अनेक ठिकाणी विधानसभा अंतिम टप्प्यात आहे अशा विविध कारखाना मात्र या अवकाळी पावसाने फटका बसणार आहे पण शेती मशागतीच्या दृष्टीने पाऊस लाभदायी ठरणार आहे.