खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापुर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या चेअरमनपदी माजी चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर (मोदेकोप) यांची तर व्हाईस चेअरमनपदी परशराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन गेल्या पंधरा वर्षे पासुन चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक शंकर पाटील (कुप्पटगिरी) यांनी खानापूर पीकेपीएस संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधात व्हावी. यासाठी संचालकसह नेते मंडळीनी सहकार्य केले. त्याबद्दल सर्वाचे आभार मानले.
तर मॅनेजर दत्ता बेळगांवकर यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे शाल, पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक अशोक पाटील, नारायण पाटील, संजय देवतकर, सुनील बिर्जे, सुरेश सुळकर, राजाराम मादार, संभाजी पाटील, मेघश्याम गाडी, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, सह अनेक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सतीश घाडी यांनी मानले.