खानापुर : एम के हुबळी नजीक मलप्रभा नदीतील भरमसाठ वाळू साठा बेकायदेशीर दिशा उपसा करून ती साठवल्याप्रकरणी एका ग्रामपंचायती अध्यक्षसह तिघांना अटक व एक ट्रॅक्टर ही जप्त करण्यात आल्याची घटना कितुर पोलिसांत झाली आहे.
याप्रकरणी वाळू उपसा करुन ती साठवलेल्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी 40 ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
एमके हुबळीजवळील दास्तीकोप्पमध्ये कित्तूर पोलिस व जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मलप्रभा नदीतून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करुन ती साठवल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत धर्मट्टी यांना मिळाली. त्यांनी कित्तूरचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व अन्य पोलिसांच्या सहकार्याने दास्तीकोप्पमध्ये वाळू साठवलेल्या ठिकाणावर छापा टाकला. येथे तब्बल 40 ब्रास वाळू साठवली होती. सदरची वाळू व दोन ट्रॅक्टर जप्त केले.
याप्रकरणी ग्रामपंचायत अध्यक्ष उमेश सिद्रामनी, ट्रॅक्टरचालक बशीर अहंमद खाजी व रमेश मडीवाळ या तिघांवर गुन्हा दाखल केला. कित्तूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.