खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
आज कल शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित व्हावे व उत्तमज्ञानांकन घेऊन भविष्यात विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात नाव कमवावे या दृष्टिकोनातून खानापूर तालुक्यातील गावचे युवा कार्यकर्ते किशोर हेब्बाळकर यांनी आपल्या थेंबाळकर कन्स्ट्रक्शन च्या वतीने तालुक्यातील विविध शाळातील माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
खानापूर तालुक्यामध्ये अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटणारा युवा सामाजिक कार्यकर्ता व तालुक्यातील युवा नेता किशोर हेब्बाळकर यांच्या हेब्बाळकर कंट्रक्शन च्या वतीने माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या वर्गातील पहिल्या चार क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षापासून किशोर हेब्बाळकर व हेब्बाळकर कंट्रक्शन च्या वतीने खानापूर तालुक्यामधील अनेक माध्यमिक विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.
शिवठाण येथील माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करताना आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात माध्यमिक विद्यालयात दहावीच्या प्रथम चार क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते अशाच पद्धतीने कापोली विद्यालयामधील विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हायस्कूल मधील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग तसेच ध्वजारोहण करण्यासाठी निमंत्रित पाहुणे उपस्थित होते