IMG-20231125-WA0037

संपादकीय: पिराजी कुऱ्हाडे / प्रतिनिधी:

नैसर्गिक सौंदर्याचा वरदान लाभलेला हा खानापूर तालुका विकासाच्या बाबतीत मागास असला तरी या तालुक्यातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच पुढारपण मात्र आपुलकीने जपलेल आहे. शांत संयमी दुसऱ्याबद्दल जिव्हाळा असणारे येथील लोक सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहेत. आणि अशा या तालुक्यात समस्या ही तितक्याच गंभीर व प्रशासन कुंभकर्ण सारखे आहे असे असतानाही समाजा प्रति बांधिलकी असणारे नागरी जीवन समाज उपयोगी व्हावे यासाठी झटणारी व्यक्तिमत्वे आपापल्या परीने कार्यरत आहेत. असच एक उमद युवा व्यक्तिमत्व व समाजमनातील उगवता तारा म्हणून ओळखले जाणारे तिवोली गावातील सुपुत्र श्री किशोर पांडुरंग हेब्बाळकर होय. अशा या उमद्या व्यक्तिमत्त्वाचा उद्या रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी 26 वा जन्मदिन. या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात…

श्री किशोर पांडुरंग हेबाळकर यांचा जन्म खानापूर तालुक्यातील तीवोली येथील एका सदन कुटुंबात झाला. इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर हेबाळकर कन्स्ट्रक्शन नावे खानापूर शहर परिसरात गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर च्या नावे उद्योग क्षेत्रात नेहमी परिचित असलेले एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये खानापूर तालुक्यातील बऱ्याच भागात आपलं सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. शिक्षणापासून सामाजिक, धार्मिक कार्यात या युवकाचा सहभागनेहमीचच . कोणत्याही कार्याचा गाजावाजा न करता केलेले कार्य समाजाप्रती सर्वोत्कृष्ट व समर्पित असणार आहे. असा हा युवा कार्यकर्ता बऱ्याच गावातील निराधारांचा आधार बनलेला आहे. समाजाशी देणे घेणे नसलेले आजचे युवक ज्याना समाजाची ओळख नाही अशा युवकापेक्षा श्री किशोर हेबाळकर यांचे कार्य समाज उपयोगी आहे. बऱ्याच जणांना मदतीचा हात देण्यासाठी हा युवक सर्वात पुढे असतो. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा व विद्यार्थ्यांमध्ये चांगले शैक्षणिक यश मिळवण्यासाठी स्पर्धा व्हावी यासाठी आपल्या परीने त्यांचे कार्य चालू आहे. कोरोना मध्ये आपल्या जीवावर उदार होऊन रुग्णांची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचे सन्मान करणे असो अथवा तालुक्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करण्याचे यांचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. दरवर्षी ते आपल्या स्वखर्चाने खानापूर तालुक्यात दहावीमध्ये उच्चांकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. शिवाय विविध धार्मिक कार्यक्रम, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा कार्यक्रमात नेहमी सहभागी होणे, कोणत्याही प्रसिद्धीला बाजूला ठेवून रंजलेल्या ,गांजलेल्या ना मदतीचा हात पुढे करणे हा त्यांचा पायंडा आहे.अशा सामाजिक युवा नेत्याचा रविवार दिनांक 26 रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी अनेक दिन दलितांना गोरगरिबांना राशन कीट वाटप करून आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!

तुझाच मित्रपरिवार

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us