- गोवा (साखळी) : गोव्यातील साखळी या ठिकाणी खानापूर तालुक्यातील युवा कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील महाराज कीरहलशी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रविवार दि. 31 डिसेंबर रोजी पार पडला. साखळी येथील श्री माऊली मंदिरात या कीर्तन सेवेत ह भ प विठ्ठल पाटील महाराज कीरहलशी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराजांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट यावेळी प्रेमपूर्वक सत्कार समारंभ झाला. यावेळी त्यांच्या कीर्तन सेवा बद्दल बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या गोवा राज्य मध्ये विठ्ठल पाटील महाराज हे लहान पणापासून आमच्या गोवा राज्य मध्ये किर्तन सेवा करतात. आमच्या गोवा राज्य मध्ये असाच त्यानी वारकरी संप्रदाय वाढवावा व जी तरुण पिढी आजची व्यसनाधीन झालेली आहे, नको त्या वाईट मार्गाने चाललेले आहे. त्याच्यावर आपण आपल्या किर्तनातुन समाज प्रबोधन करावे व आपली किर्तन सेवा गोवा राज्य मध्ये अशिच होत रहावी व एक भक्तीचे वातावरण व्हावे आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले. त्यावेळी गोवा वारकरी मंडळी व ह. भ. प. विठोबा सावंत (निलावडे) खानापूर मार्केटिंग सोसायटी डायरेक्ट हे उपस्थित होते.