खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कसबा नंदगड ता. खानापूर येथे पोलिस स्टेशन जवळ, सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी युवा वारकरी संघटनेच्या वतीने ज्ञानयज्ञ गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता पुजा कार्यक्रम त्यानंतर मान्यवरांचे विचार होऊन पंचपदी आरती होणार आहे. दुपारी १२ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत अनेक प्रख्यात किर्तनकार मंडळींची किर्तने व हरिपाठ, प्रवचन, नामजप होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात श्री.विठ्ठल सोमाण्णा हलगेकर लोकप्रिय आमदार खानापूर श्री. अरविंद चंद्रकांत पाटील, माजी आमदार खानापूर. श्री. प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, खानापूर श्री. सदानंद पाटील, लैला शुगर फॅ. एम.डी. खानापुर श्री. संजय कुबल, बीजेपी माजी अध्यक्ष, खानापूर ,श्री. बाबुराव देसाई, माजी जि. पं. सदस्य लोंढा, श्री. जोतिबा रेमाणी, माळी जि. पं. सदस्य, नंदगढ श्री. ईश्वर घाडी, काँग्रेस अध्यक्ष व समाजसेवक खानापूर श्री. पी. एच. पाटील, संचालक मार्केटींग सोसा. क. नंदगड श्री. पंडीत ओगले, समाजसेवक बीजेपी युवा नेता खानापूर ह.भ.प. शिवाजी रामचंद्र पाटील, उद्योगपती यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी मान्यवर आणि उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.