खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या भिमगड अभयारण्य सह विविध भागात विविध प्रकारचे साप नेहमी आढळतात. मात्र किंग कोब्रा नामाक जातीच्या सापाचे दुर्मिळ दर्शन असते. दोन दिवसापूर्वी मळव नजीक एका झाडावर किंग कोब्रा असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी लागलीच आपल्या मोबाईलवर त्याला टिपले. सदर किंग कोब्रा साप जवळपास 13 ते 14 फूट लांबीचा होता अशी माहिती त्या शेतकऱ्यांनी दिली.
किंग कोब्रा झाडावर असल्याचे निदर्शनाला येताच त्या शेतकऱ्याने तातडी गावात ही बाब कळवली. वन खात्यालाही याबाबत माहिती देण्यात आली. पण तोवर किंग कोब्रा साप जंगलात गेल्याने वन खात्याच्या अधिकाऱ्यांनाही तो दिसला नाही.किंग कोब्रा दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. हा साप घनदाट जंगलात आणि उंच प्रदेशात राहतो. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. त्याचा रंग गडद तपकिरी असून शरीरावर पिवळे पट्टे असतात. त्याची लांबी सुमारे 3-4 मीटर आहे. घनदाट जंगलात अशा सापांचे दर्शनही दुर्मिळ असते. अशाच प्रकारचा हा दुर्मिळ साप होता असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले.