
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
येथील सब -रजिस्टर ऑफीसमधे गोर गरीब जनतेकडून हजारो – लाखो रूपयांची लूट आणि मगच सेल डीड ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे खानापूरचे सब रजिस्टर ऑफिस म्हणजे निव्वळचा अड्डा बनला आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून यासंदर्भात लवकरच लोकायुक्त पोलीसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व महांतेश राऊत यानी म्हटले आहे.
खानापूरात ३०/४० आकाराच्या प्लॉट ला १५००० रूपये सब-रजिस्टर ऑफीस च्या नावाने घेतले जात असल्याची तक्रार काही प्लॉट धारक शेतकऱ्यांनी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसकडे केली आहे.
गोर गरीब लोकं सामान्य जनता शेती किंवा प्लॉट का विकतात . प्रास्ताविक सामान्य जनता ही आपल्या अडचणीनुसार जमिनीचे व्यवहार करत असतात. अडचणीच्या काळात होणारी विक्री ही आर्थिक गरजेची असते पण अशातच सर रजिस्टर कार्यालय तसेच येथील काही एजंट यामध्ये माहिर आहेत. काही एजंट आणि सब रजिस्टर कार्यालयाला कब्जाच केला आहे. यासंदर्भात यापूर्वीही सब- रजिस्टर कार्यालयात अनेक तक्रारी गेल्या आहेत यामध्ये नदीच्या काळात सुधारणा झाली नाही तर बेंगलोर दरबारी लोकायुद्धाकडे या संदर्भात ब्लॉक काँग्रेसच्या वतीने रीतसर तक्रार करण्यात येणार असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली.