- खानापूर : गाव, तालुका ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमुळे सर्वच खेळांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
- खेळातून करिअरच्या अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. परिश्रम, जिद्द आणि प्रयत्नातील सातत्य यांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने झोकून दिल्यास यशाला गवसणी घालता येते. जो समाज खेळांना महत्त्व देतो तेथे सन्मान आणि देशाभिमान दोन्ही हातात हात घालून दिसून येतात. खानापुरात पहिल्या वहिल्या कराटे आकादमीच्या उद्घाटनाने कराटे खेळात आवड जोपासणाऱ्यांची उत्तम सोय झाली आहे त्याचा कराटे प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
- शहरातील रवळनाथ मंदिरात स्वरक्षण कराटे अकादमीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रवळनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रताप सरदेसाई होते.
- ते म्हणाले, कराटे या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी पहिली संस्था साकार झाल्याने या कलेची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थी, युवती आणि खेळाडूंची सोय झाली आहे. कराटे ही शक्ती बरोबरच युक्तीचे महत्त्व सांगणारी कला आहे. ही कला युवती आणि महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी समर्थ बनविते. ती आत्मसात करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.
- उद्योजक शरद केशकामत, पंडित ओगले, अध्यक्ष संदीप पाटील, मारुती गावडे यांच्या हस्ते अकादमीचे उद्घाटन करण्यात आले.
- खेलो इंडिया स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या करंबळ येथील रंजना नार्वेकर आणि संजना नार्वेकर या ब्लॅक बेल्ट धारक कराटेपटूंचा तसेच त्यांना घडवलेले वडील विद्याधर नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, सचिव गुंडू तोपिनकट्टी, गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रवी काडगी, आर. पी. जोशी, अनिल कदम, यशवंत गावडे, जगदीश शिंदे, महेश पाटील, अमृत पाटील, आदी उपस्थित होते. प्रशांत आळवणी यांनी सूत्रसंचालन केले.
- अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 9823780283 किंव्हा 8762745577 श्री संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.