खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
“माझ्या काॅलेमध्ये एकमेकांना भेटताना जय हिंद हा नारा दिला जातो आणि तेच माझ्या यशाचा प्रेरणास्थान आहे!”असे गौरवोद्गार कुमारी विकीता विष्णू गावडे या विद्यार्थिनीने व्यक्त केला.हे उद्गार होते तिच्या भरती झाल्याबद्दल कॉलेजच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी भावनिक उद्गार व्यक्त केले.
देशाचे आम्ही शुर शिपाई
आम्ही कोणा भिती नाही
पाऊल आमचे पुढेच जाई
भीतीची तर मुळीच बाधा नाही!
याचे बाळकडू विद्यार्थ्यांना पाजणाऱ्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी काही वर्षांपूर्वी या शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना’जय हिंद’चा नारा दिला आणि तो आजतागायत चालू राहीला आहे. हेच ब्रीद वाक्य प्रेरणेचे स्तोत्र बनावे आणि विद्यार्थ्यांनी झपाटून जावं असाच काहीसा हा अनुभव आहे!
कुमारी विकीता विष्णू गावडे ही खानापूरातील एका गंवडी कामगारांची कन्या कौटुंबिक परिस्थिती बेताचीच आहे. विकीताला परिस्थितीचा गुलाम होणं अमान्य होतं प्राप्त, परिस्थितीला संधीचं स्वरूप देऊन,खडतर मेहनतीची जोड देत, जे ठरवलय ते साध्य करायचचं!अशा बाणा घेऊन गेली तीन वर्षे ती प्रयत्नात राहीली आणि तीन वर्षाच्या कठोर तपश्चर्येचे फळ तिला आज मिळाले.
भारतीय लष्करात ती सी आय एस एफ या दलात भरती झाली असून या भरती प्रक्रीया दरम्यान घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान,गणिती चातुर्य,विज्ञान व शारिरीक क्षमता अशा सर्व निकषात ती अव्वल ठरली आहे.
गेल्या दोन वर्षांत म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्याने भारतीय सैन्यात दाखल होत आहे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.या महाविद्यालयाच्या आता पर्यंत जवळ जवळ बारा विद्यार्थिनी भारतीय सैन्यात दाखल झाल्या आहेत म्हणून मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी विशेष कौतुक केले असून ज्येष्ठ संचालक श्री परशराम गुरव व संचालक श्री शिवाजीराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय सैनिक ही देशाची सर्वात मोठी संपती आहे, सैन्यात भरती होणं हे सर्वात कठीण काम असते हे ओळखून आव्हानात्मक खडतर मेहनत घेण्यासाठी सज्ज झालेल्या व अभिमान वाटावा अशा भारतीय तिरंग्याच्या सेवेप्रती विकीताने आपले उत्तम योगदान द्यावं,उत्कट देशभक्ती,शौर्य आणि धैर्य याची वेळोवेळी झलक दाखवावी याकरिता तिला म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विकीताचे वडील विष्णू गावडे प्रा.पुंडलिक कर्लेकर, प्रा.रूद्राप्पा मरित्तमण्णावर,प्रा.जयश्री शिवठणकर,प्रा.सुनिता कणबरकर,जोतिबा घाडी,सीमा सावंत, चित्रा अर्जुनवाडकर,प्रा.आरती नाईक प्रा.सरोज खांबले,प्रा.सोनल पाटील,प्रा.ऋतू पाटील व इतर उपस्थित होते.