खानापूर:
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल निवडणूक लढवणार असल्याची माहिती कर्नाटक राज शिवसेना उपाध्यक्ष के पी पाटील यांनी मंगळवारी खानापुरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, कर्नाटकात शिवसेनेला मानणारा सैनिक मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून कर्नाटकात अनेक ठिकाणी कार्यकर्ते विस्तारले आहेत. त्यामुळे कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी 110 क्षेत्रात निवडणूक लढवणार असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी लढवण्याचा निर्णय शिवसेना प्रमुखांनी घेतला आहे.
खानापुरातून आपणाला म्हणजे के.पी. पाटील यांना शिवसेनेच्या ‘मशाल’चिन्हावर बी फार्म शिवसेनाप्रमुखांनी सुपूर्द केला आहे. येत्या दी.15 पर्यंत खानापुर विधानसभा क्षेत्रात आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सीमाभागात आतापर्यंत शिवसेनेने कधीच निवडणूक लढविली होती. शिवसेना नेहमी समितीच्या पाठीशी राहिली होती. पण आता समितीतील वाढत्या मतभेद व दुफळीमुळे मराठी माणूस विखुरला जात आहे. सीमा भागातील मराठी माणसाला तारणारा केवळ शिवसेना पक्ष असून यासाठीच सीमा भागातील 4 क्षेत्रात शिवसेनेच्या “मशाल” चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असून सीमा भागातील मराठी भाषिकांनी आता शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तालुका शिवसेना अध्यक्ष नारायण राऊत, उपाध्यक्ष प्रकाश पाटील सोशल मीडिया प्रमुख दत्तात्रय हेगडे युवा अध्यक्ष मोहन गुरव आधी उपस्थित होते