खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळया दिनी येथील शिवस्मारकाच्या सभागृहात लाक्षणिक उपोषण व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. राजा शिवस्मारक येथील कै. माजी आमदार व्ही वाय चव्हाण सभागृहात लाक्षणिक उपोषण सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
- प्रास्ताविक महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी करून 1956 पासून आज तागायत सिमा प्रश्नाच्या संदर्भात आपले विचार मांडले. यावेळी लाक्षणिक उपोषणाला खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण, शंकरराव पाटील, वसंत नावलकर, माजी झेडपी विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, खजिनदार संजय पाटील व पांडुरंग सावंत, उप सेक्रेटरी रणजित कल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष जयराम देसाई, मारुती दे गुरव, कृष्णा कुंभार, कृष्णा मनोलकर, रमेश धबाले, मध्यवर्ती सदस्य जगनाथ बिर्जे व गोपाळ पाटील व रुकमाना झुंजवाडकर व सदानंद पाटील व रवींद्र शिंदे व रामचंद्र गावकर व अजित पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, डी एम भोसले, शंकर अ गावडा, रमेश वसतराव देसाई, जगनाथ देसाई, राजाराम देसाई, ब्रम्हानंद पाटील, यशवंत बिर्जे, शिवाजी क पाटील, शिवाजी सहदेव पाटील, अमृत पाटील, गंगाधर घाडी, विलास बेडरे, शंकर गुरव, मुकुंद पाटील, यशवंत पाटील, संजय पाटील, नागोजी पावले, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, अनिल बेळगावकर, सातेरी पाटील, महादेव घाडी, तुळजाराम गुरव, विठ्ठल कोडचवाडकर, अनंत गुरव, बळीराम देसाई, सुनील पाटील, परशराम चोपडे, अशोक बेळगावकर, देवाप्पा पाटील, मोहन नीलजकर, गोपाळ हेबाळकर, भोमाणी यळूळकर, विठ्ठल गुरव, डी एम गुरव, ए एम पाटील, विठ्ठल देसाई, रविंद्रे देसाई, शिवाजी सडेकर, पांडुरंग पाटील, महात्रू धबाले, मष्णू धबाले, मल्हारी खांबले ,पपू पाटील,बी बी पाटील, मोहन गुरव, राघोबा मादार,, पुंडलिक पाटील, के पि पाटील, गणपती पाटील, बी एन पाटील, पि आर पाटील, प्रवीण रामचंद्र पाटील, राजेंद्र कुलम,नाना घाडी, गोपाळ घाडी, गंगाधर घाडी, सुभाष घाडी, हणमंत जगताप, नारायण सुतार, खिराप्पा साबळे, भैरु मुतगेकर, गावडू पाटील, बळवंत देसाई, सुधीर नावलकर, प्रल्हाद घाडी, अर्जुन देसाई, नागेश पाटील, मारुती पाटील,, दीपक ना पाटील, प्रल्हाद मादार, दत्ता गावंडे, वासुदेव चौगुले, राजू कुंभार, नागेश कोळेकर, मधुकर पाटील, कृष्णराव राणे,, संजय पाटील, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.