खानापूर/ प्रतिनिधी: रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायिकाला हॉटेल बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला सरकारी कामात अडथळा करत तसेच जातीवाचक शिव्या देऊन मारहाण करण्याचा केल्याच्या आरोपावरून खानापुरातील एकाला अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव श्रीधर बसवराज अंकलगी उर्फ बांबू (वय 33) बुरुड गल्ली, खानापूर असे आहे.
या बाबत मिळालेली माहिती की, खानापूर पोलिसांची दररोज रात्रीच्या वेळी शहर परिसरात गस्त असते. रात्री बारानंतर कोणताही हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास मनाई आहे, पण हलकर्णी क्रॉस खानापूर येथील गुड मॉर्निंग हॉटेल रात्री एक पर्यंत सुरू असल्याने हॉटेल मालक बाळाराम नायक यांना हॉटेल बंद करण्यासाठी सूचना करत असताना हॉटेलमध्ये असलेल्या श्रीधर उर्फ बांबू याने सरकारी कामात अडथळा करत आपल्याला शिवीगाळ केली व आपला कॉलर पकडून मारहाण केल्याचा आरोप हवालदार परशराम चांभार यांनी त्याच्यावर आरोप करून पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी गुन्हा नोंद करून आरोपी बांबू उर्फ श्रीधर याला अटक केली. पण जामिनीवर त्याची नंतर सुटका झाल्याचे समजते. त्याच्यावर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा कलम क्रमांक138/2023, 341 332, 323, 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. श्रीधर हा खानापूर येथील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मी अंकलगी यांचा सुपुत्र आहे.