- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुका हा जंगलपट्ट्यात व्यापलेला तालुका असला तरी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकातील 156 तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील केवळ खानापूर व बेळगाव या दोनच तालुक्यांना वगळण्यात आले आहे. खरं तर बेळगाव खानापूर भागात होणाऱ्या पावसामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेला मुबलक पाणी मिळते पण यावर्षी सह्याद्रीच्या कपारीत खानापूर तालुक्याच्या अनेक भागात दरवर्षीच्या तुलनेत फारच पाऊस कमी आहे असे असताना खानापूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आला नाही. हे खानापूर तालुक्यावर अन्याय करत आहे यासाठी खानापूर तालुक्याच्या भौगोलिक पिकाची पाहणी करून या तालुक्याचाही दुष्काळी यादी समावेश करावा. कर्नाटक सरकारने यासंदर्भात केवळ सॅटलाईटच्या आधारावर भात पिकांची पाहणी न करता खानापूर तालुक्यात दरवर्षीच्या पावसाची तुलना व यावर्षीच्या झालेल्या पावसाची तुलना लक्षात घेता खानापूर तालुक्याचा देखील यावर्षी या दुष्काळी यादीत समावेश करून या भागात रोजगार तसेच विकासामुळे कामे मंजूर करावीत अशी मागणी करणारे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कर्नाटक महसूल विभागाच्या विभागाच्या अपर सचिव रश्मी महेश यांच्याकडे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
ಇಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ರಶ್ಮೀ ಮಹೇಶ್ ರವರನ್ನು ಖಾನಪುರು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ವಿಠಲ ಎಸ್.ಹಲಗೇಕರ ಅವರು ಬೇಟಿ ಮಾಡಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನ ಬರ ಪೀಡಿತ ತಾಲೂಕ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡುವಂತೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕ ಸಂಪೂರ್ಣ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ರೈತರು ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡುವ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದೆ. ಈ ವರ್ಷ ನಿರ್ಧಿಷ್ಟ ಅಗತ್ಯ ಮಳೆ ಬಾರದೇ ರೈತರು ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ ಬೆಳೆದ ಬೆಳೆಗಳು ಒಣಗಿ, ಕೈಗೆ ಬಂದ ತುತ್ತು ಬಾಯಿಗೆ ಬಾರದಂತಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದ ರೈತರು ತೀವ್ರ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವಂತಾಗಿದೆ ಆದ ಕಾರಣ ತಕ್ಷಣ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನ ಬರಪೀಡಿತ ತಾಲೂಕ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವ ರೈತರಿಗೆ ಜೀವ ತುಂಬುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಶಾಸಕರಾದ ವಿಠಲ ಎಸ್. ಹಲಗೇಕರ ಅವರು ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡರು