खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी!
खानापूर नगरपंचायतीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कर्मचारी वर्गाने संप पुकारला. याशिवाय त्यांच्यावर असलेल्या विविध तक्रारीची दखल लक्षात घेतला त्यांची खानापूर नगरपंचायती मधून बदलीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले आहेत. त्यांच्या जागी बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचारी व यापूर्वी खानापूर नगरपंचायतीवर मुख्याधिकारी म्हणून काम केलेले संतोष कुरबेट यांची या ठिकाणी पुढील सरकारी आदेशापर्यंत प्रभारीम्हणुन नियुक्ती करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात मुख्याधिकारी राजू वठारे यांच्यावर मुख्य असलेल्या तक्रारींची दखल करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने खानापूर नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांची वेतन न काढणे, नगरपंचायतीचे निवृत्त कर्मचारी विठ्ठल पाटील यांचे वेतन व निवृत्ती फंड वेळीच अदा न करणे, अटल बिहारी वाजपेयी नगरातील फलक काढल्याप्रकरणी आलेल्या नोटिसाची दखल, कंत्राटी टॅक्सी घेऊन अपघात करणे, या प्रमुख विषयांच्या तक्रार जी दखल लक्षात घेता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यांना तात्काळ बदलीचे आदेश दिले आहेत. मुख्याधिकारी राजू वठारे यांची या नगरपंचायतीतून हकालपट्टी केल्याबद्दल यांच्या मनमानीला कंटाळालेल्या कर्मचारी वर्गात या आदेशामुळे समाधान पसरले आहे