खानापूर : कारवार लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी ता. १२ रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथील व्हि वाय चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे. त्यामुळे बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, कर्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सर चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.