
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: मराठा मंडळ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आली आहे. या शिक्षण संस्थेत कला, क्रीडा, सामाजिक उपक्रम, याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर भर दिला जातो. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू ( हलगेकर) मॅडम या नेहमीच अशा उपक्रमामध्ये कल्पक मार्गदर्शकाच्या भूमिका निभावतात.
यावर्षीच्या बारावीच्या पी यु बोर्ड परीक्षेत कॉलेजचा एकूण निकाल 66 % टक्के लागला. एकूण 287 विद्यार्थी बसले होते. विशेष श्रेणी 10, प्रथम श्रेणी 116, द्वितीय श्रेणी 38 तृतीय श्रेणी 17, असून कला शाखेचा 53 % टक्के, वाणिज्य शाखेचा 71.55%टक्के, विज्ञान शाखेचा 66 % टक्के
कॉलेज टॉपर विद्यार्थीनी
1) कु. असनिया संगनमुल्ला 90.5%
2) कु. अस्मिता दालमेट 90 %
3) कु. रेणुका सांबरेकर. 89 %
4) कु. अपूर्वा एन कांबळे 89 %
5) कु. अंकिता भडवणकर 88.17%
कला शाखेत.
1) कुमारी. अपूर्वा एस कांबळे 89 %
2) कुमारी. स्नेहा सन्नवगोळ 77 %
3) कुमारी. संजना कोलकार. 76 %
4) कुमारी. भारती कांबळे 74.3 %
वाणिज्य शाखेत
1) कु.आसनिया संगणमुल्ला 90.5%
2) कुमारी रेणुका सांबरेकर 89.33 %
3) कु.अंकिता भडवनकर 88.17 % 4) कु. प्रणाली धामणेकर. 87.03 %
- विज्ञान शाखेत
1.कु. अस्मिता दालमेट 90 %
2.कु. अश्विनी गावकर 87.06 %
3.कु पूजा भेकणे. 86.03 %
4.कुमार. विनायक पाटील 80. 16 % या सर्व विद्यार्थिनींना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू( हलगेकर) मॅडम,
मराठा मंडळाचे डायरेक्टर श्रीमान परशराम रामचंद्र गुरव साहेब श्रीमान शिवाजीराव शेषापणा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीमान वाय. एच. अनगोळकर कॉलेजचे प्राध्यापक, पालक वर्ग या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.