- ‘खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- जागतिक जल दिनानिमित्त’ आज बेळगांव व खानापूरच्या सर्व संघ-संस्थांनी एकत्र येऊन खानापूरची जीवनदाईनी मलप्रभा नदीची स्वच्छता केली.
- आज रोजी दि. 22 मार्च 2024 ला सर्वत्र ‘जागतिक जल दीन साजरा होत आहे. या दिनानिमित्त’ बेळगांव व खानापूरच्या सर्व संघ-संस्थांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्यावतीने आवाहन करण्यात आले होते.
- त्यानुसार ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपसह खानापूर शहरातील लायन्स क्लब, इनरव्हिल क्लब खानापूर, आरएसएस व योगा असोशियेशन खानापूर, बार असोसीयेशन खानापूर, माजी सैनिक संघटना, वरीष्ठ नागरिक संघटना, क्षत्रिय मराठा परीषद, सीटीझन्स फोरम खानापूर, नितीन पाटील फिटनेस क्लब, व्यापारी संघटना या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी, रामलिंग देवस्थान असोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्राची व आजूबाजूच्या परीसराची स्वच्छता करून जागतिक जलदिन साजरा केला, जेणेकरून येथे पसरलेले विषारी घटक पाण्यात मिसळून नदी दूषीत होऊ नये. करण्याचे ठरवले आहे.
- मलप्रभा नदी घाटाला भेट देणाऱ्या भाविकांनी नदीच्या पात्रात प्लॅस्टिकचा कचरा, जीर्ण कपडे, नकोसे देवाचे फोटो, पुजेचे साहित्य, निर्माल्य टाकून नदी दूषित करू नये असे सर्व संस्थांच्यावतीने विनंती केली. तसेच खानापूर नदीच्या तीरावरील गावकऱ्यांनी आपले सांडपाणी आणि उद्योगातील विषारी पाण्यावर प्रक्रिया करून नदीत पात्रात सोडावे आसे आॕपरेशन मदत ग्रूपच्यावतीने आवाहन केले आहे. यासाठी लवकरच नियमावली बनविण्यासाठी खानापूर नगरपालिकेतर्फे व स्थानिक ग्रामपंचायतीना निवेदन देण्यात येणार आहे. आपली मलप्रभा नदी स्वच्छ राखण्यासाठी खानापूरच्या प्रत्येक सामाजिक संथानी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी सहभाग दर्शवावा यासाठी आगामी काळात व्हावे असे सर्वानुमते वाटते.
- यावेळी कॕ नितीन धोंड, भाऊ चव्हाण, अजित पाटील, महेश पाटील, शिल्पा कल्याणी, आरती पाटील, सुभाष देशपांडे, गणपत गावडे, मदन सरदेसाई, श्रावणी सरदेसाई, सृष्टी सरदेसाई, शौर्य सरदेसाई, राहुल पाटील व वेगवेगळ्या सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता केली.